Wednesday, October 10, 2018

फेसबुक आणि व्हाट्सएप पैसे कसे कमवतात ???


व्हाट्सअप फेसबुक पैसे कसे कमवता हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल? कारण या सेवा तर आपल्याला फुकटात मिळतात पण तुम्ही म्हणाल आम्ही तर नेटचा रिचार्ज केला आहे. मग कसला फुकटात ? पण मित्रांनो आपण केलेला रिचार्ज इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर ला देतो फेसबुक आणि व्हॉट्सऍप ला नाही. मग हा पैसा तर यांना भेटत नाही मग यांनी समाजसेवा करण्यासाठी फ्री मध्ये सेवा देतात की काय? याचे उत्तर आहे-
 जर एखादी वस्तू अथवा सेवा काही खर्च न करता मोफत भेटत असेल तर त्या उत्पादक कंपनीसाठी तुम्ही स्वतः त्या कंपनीचे उत्पादन (Product) बनता. कंपनीच्या वस्तू अथवा सेवा नव्हे.

 ते कसे समजून घेऊयात 

तुम्हाला माहीत असेल की फेसबुकने व्हाट्सएपला खरेदी केले आहे. जगात व्हॉट्सऍप चे कित्येक कोटींमध्ये यूजर्स आहेत. दररोज सुमारे 600 कोटी पेक्षा जास्त मेसेज हे व्हाट्सअपद्वारे पाठवतात. आता विचार करा एवढ्या मोठ्या मॅसेजची साईज हजारो लाखो टीबी मध्ये असेल. आता हा जो सर्व डेटा आहे तो फेसबूक आपल्या जाहिरातीच्या बिझनेस साठी वापर करतो.

पण तो कसा? 

आपण जेव्हा आपण फेसबुक ओपन करतो त्यावेळेस होमपेजवर तुम्हाला काही जाहिराती दिसतात. या जाहिरातींची विशेषतः म्हणजे आपल्या आवडीशी संबंधित असतात. उदाहरणार्थ जर मी एखादे घड्याळ घेण्यासाठी ॲमेझॉन ,फ्लिपकार्टवर सर्च केले परंतु घेतले नाही. अथवा ते मी माझ्या व्हाट्सअपवर मित्राला पाठवले. तर काही दिवसांनी मला माझ्या फेसबुकच्या होमपेजवरही त्या घडाळ्याशी संबधित एक जाहिरात दिसेल. आणि जीची किंमत थोडीशी कमी असेल. नंतर ते घड्याळ आवडल्यास मी तिथून संबंधित संकेत स्थळाला भेट देऊन ते विकत घेईन. मित्रांनो ही आहे त्यांची खरी कमाई !!
फेसबुक आणि व्हाट्सएपचा डेटा हा आपल्या जाहिरातीच्या बिजनेससाठी वापरतो. आपण कुठे आहोत? आपलं नाव? आपण कोणत्या गोष्टी शेअर करतो ? आपल्याला कोणत्या गोष्टी आवडतात ? व कोणत्या नाही? आपला व्यवसाय कोणता आहे? आपले नातेवाईक कोण आहेत? त्यांच्यासोबत आपण कसे वागतो? अशा सूक्ष्म गोष्टींचं तपशील फेसबुक आणि व्हॉट्सऍपच्या डेटावरून करतात. प्रत्येक गोष्टीची नोंद त्यांच्या सिस्टीम मध्ये स्टोर होते. त्यानुसार ते युजर्सची विभागणी करतात. आवडी-निवडी नुसार वयानुसार,व्यवसायानुसार, राहत असलेल्या ठिकाणानुसार, सर्व बाबींची दररोज पडताळणी करून त्यांची विभागणी केली जाते.

आता ज्यांना आपले प्रॉडक्ट विकायचे आहे अशा कंपनी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, शॉप क्लूज किंवा साधारण माणूसही ज्याचे लोकल बिजनेस आहे ते जाहिरातीसाठी फेसबुकशी संपर्क करतात. जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी फेसबुक त्यांच्याकडून पैसे घेतो. नंतर ही जाहिरात टार्गेटेड(लक्षित) व्यक्तीच्या होम पेजवर दाखवली जाते. त्यानंतर संबंधित युजर त्या लिंक वर जाऊन त्यांचे प्रॉडक्ट खरेदी करतात. व असा या कंपन्या आपला सेल्स वाढवतात अथवा मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरतात .


एका अंदाजानुसार फेसबुक आपला 95 टक्के महसूल हा जाहिरातीच्या माध्यमातून कमावतो. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग हा जगातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत पाचवा आहे. आपला महत्वपूर्ण डेटा हा दुसऱ्या कंपनी ला देखील विकून पैसा कमावतात याचे उदाहरण म्हणजे सध्या चर्चेत असलेला केंब्रिज ऍनालिटिकल डेटा घोटाळा..

मित्रांनो लेख कसा वाटला खाली नक्की कंमेंट करा आणि आवडल असेल तर नक्की शेयर करा तसेच आमचे फेसबुकचे पागे लाईक करा जेणेकरुन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहचेल.

This Is The Newest Post
PREVIOUS ARTICLE Previous Post
This Is The Newest Post
PREVIOUS ARTICLE Previous Post
 

Delivered by FeedBurner