Wednesday, October 10, 2018

पॅन कार्ड म्हणजे काय हो ?मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे पॅन कार्ड असेल. काहींकडे नसेल काहींनी त्यासाठी अर्ज देखील केला असेल. काहींनी त्याबद्द्ल ऐकल तर असेलच. परंतु आज आपण या लेखामध्ये पॅन कार्ड म्हणजे नेमकं काय? हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ.याचा लॉंगफॉर्म होतो . परमनंट अकाऊंट नंबर म्हणजेच कधीही न बदलणारा खात्याचा क्रमांक जो आयकर विभाग म्हणजेच इन्कम टॅक्स डिपारमेंट कडून जारी केला जातो. 
    
याचा मुख्य उद्देश असतो कर चोरी अथवा टॅक्सची चोरी थांबवणे.
आता ते कसे पाहूयात 

आपल्यालाही माहीतच आहे की हा क्रमांक कधीही बदलत नाही. एखाद्या व्यक्तीने केलेल्या सर्व ट्रांजेक्शन अथवा व्यवहाराला लिंक करण्याचे काम हा नंबर करतो.

समजा मी उद्या एक सहा लाखाचे नवीन चार चाकी वाहन घेतले. एक दोन दिवसानंतर एक लाखाची बुलेट विकत घेतली. माझ्या बँकेच्या खात्यावरून काही पैसे काढले समजा मी आठ लाख रुपये काढले. नंतर थोड्या दिवसांनी पुण्यामध्ये दोन गुंठे जमीन खरेदी केली. मी एकूण चार ट्रांजेक्शन अथवा व्यवहार केले. हे चारही ट्रांजेक्शन करताना मला पॅन कार्ड ची आवश्यकता लागेल. 
          

याशिवाय हे ट्रांजेक्शन होऊ शकणार नाही कारण चार चाकी खरेदी करणारा करताना मला माझा पॅन कार्डचा नंबर द्यावा लागेल. बुलेट घेतानाही द्यावा लागेल. राहिला प्रश्न बँकेचा तर तो मी खाते खुलताना अगोदरच दिलेला असणार आणि जागा खरेदी करण्यासाठी देखील द्यावा लागेल.

आता हे चारही व्यवहार एकच नंबरने लिंक असल्याने डिपार्टमेंटला माझ्या सर्व ट्रांजेक्शन ची माहिती मिळेल. त्यानंतर त्यांच्या दरानुसार मला इन्कम टॅक्स भरावा लागेल कुठल्याही प्रकारची टॅक्सची चोरी करू शकणार नाही. 

खलील दर हा 60 वर्षाच्या आतील नागरिकांसाठी आहे. 
0 ते 2.5 लाख रुपए           0%     
2.5 लाख से 5 लाख           5%             
5 लाख ते 10 लाख           20%           
10 लाखच्या वर                30%
तर मित्रानो पॅन कार्डचा महत्व तुमच्या लक्षात आलेच असेल. आवडल असेल तर नक्की शेयर करा...


NEXT ARTICLE Next Post
PREVIOUS ARTICLE Previous Post
NEXT ARTICLE Next Post
PREVIOUS ARTICLE Previous Post
 

Delivered by FeedBurner