Saturday, October 6, 2018

शासन भरपूर नोटा छापून सर्वांना श्रीमंत करीत का नाही?नमस्कार मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे की का शासन भरपूर नोटा छापून सर्वांना श्रीमंत करीत का नाही? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल भारतामध्ये एवढी गरिबी आहे, बेरोजगारी आहे. असं आपण म्हणतो.
 आपण नोकरी करतो, व्यवसाय करतो, का कशासाठी ? पैसे कमावण्यासाठीच ना? मग शासन आपल्यासाठी थोड्याश्या जास्त नोटा छापून सर्वांना श्रीमंत करीत नाही? जर सर्वजण श्रीमंत झाले तर किती छान होईल ना कामाचा ताण, नोकऱ्यांसाठी रात्रंदिवस अभ्यास करण्याची गरजही राहणार नाही.आपल्याला पाहिजे ती वस्तू भेटू शकेल. आयफोन, ऑडी पाहिजेल ते भेटेल. 
सर्व काही एकदम झकास होईल.


परंतु मित्रांनो आपण चुकतोय !! ते कसे पहा 

एक उदाहरणाने ते समजून घेऊयात.
जर अँपल कंपनीने केवळ एक हजार आयफोन बनवले. की ज्याची किंमत एक लाख रुपये आहे आणि विक्रीसाठी बाजारात उपलब्ध केले.


 आता भारतामध्ये समजा एक कोटी लोकसंख्या आहे प्रत्येकाला वाटतेकी स्वतःकडे आयफोन पाहिजे परंतु पैसे नसल्याने तो ते खरेदी करू शकत नाही परंतु या एक कोटी लोकांपैकी जर 1500 लोकांची ऐपत असेल. तर त्यातील 500 जणांना आवडत नसल्याने ते घेणार नाहीत आणि केवळ एक हजार श्रीमंत लोक फोन विकत घेतील.
 परंतु 99 लाख 98 हजार 500 लोकांची आयफोन घेण्याची इच्छा असून देखील खरेदी करू शकत नाही. कारण त्यांच्याकडे पैसे नाहीत.
आता शासनाने असे ठरवले पण जास्त नोटा छपाई करून या उर्वरित जनतेला आयफोन खरेदी करता येईल एवढे एक लाख रुपये त्यांच्या बँक अकाउंटवर ट्रान्सफर केले. 

एक लाख रुपये सर्वांकडे आहे. सर्वजण आयफोन  घेण्यासाठी बाजारात अथवा दुकानात गेले. विचार करा ग्राहक आहेत 99 लाखापेक्षा जास्त आणि फोन आहे केवळ 1000. म्हणजेच ग्राहकांच्या तुलनेत खूपच कमी.आता प्रत्येकाला तर आयफोन मिळणे अशक्य आहे कारण मर्यादित स्टॉक आहे. थोडक्यात येथे मागणी प्रचंड आहे आणि पुरवठा खूप कमी आहे.

 आता होणार काय ?

ज्या वेळेस एखाद्या वस्तूची मागणी प्रचंड वाढते परंतु मागणीच्या संबंधात पुरवठा कमी असतो, त्यावेळेस त्या वस्तूची किंमत झपाट्याने वाढते.

म्हणजेच आयफोनची किंमत आता वाढणार. त्याची किंमत दोन लाख रुपये एवढी वाढणार. परंतु दोन लाख रुपयांचा आयफोन घेण्याची ऐपत तर आता सगळ्यांची नसणार. म्हणजेच एक कोटी लोकांपैकी केवळ पंधराशे लोकांचीच असणार आणि त्यामुळे संपूर्ण बाजाराचे किंमतीची प्रणाली पूर्णपणे, स्वतःहून बदलणार म्हणजे याचा अर्थ शासनाने केलेल्या नोटा छपाई चा प्रयत्न पूर्णपणे व्यर्थ जाणार.
येथे अर्थशास्त्राच्या भाषेत सांगायचे म्हणजे मागणी - पुरवठा यातील संबध होय
थोडक्यात एखादया वस्तूची किंमत ही बाजारात असलेल्या मागणीवर अवलंबून असते. वरील उदाहरणामध्ये सर्वाना आयफोन जर पाहिजे असेल आयफोनचा पुरवठा बाजारात वाढवला पाहिजे. जेणेकरुन फोनची किंमत आपोआप कमी होईल आणि ते सामान्य जनतेच्या आवाक्यात येईल. परंतु आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवरील संसाधने ही मर्यादित आहे. म्हणून त्यांच्या उपलब्धतेनुसार त्याची किंमत ठरवली जाते.

एक उदाहरण घेऊ सध्याची कांदा बाजारपेठ. विचार करा बाजारात पुरवठा अधिक आहे परंतु मागणी खूपच कमी असल्याने 2 रुपये किलो अशी अवस्था झाली आहे. दुसरे उदाहरण म्हणजे सोन्याची किंमत मात्र वाढतच जाते कारण मागणी जास्त आहे.


तर मित्रानो तुमच्या लक्षात आलं असेल की शासन नोटा छापून का सर्वांना श्रीमंत करीत नाही. जर तुमच्या मनात काही शंका असेल तर खाली कंमेंट करा. आणि लेख आवडला असेल तर नक्की शेयर करा.

धन्यवाद..!!

 
NEXT ARTICLE Next Post
PREVIOUS ARTICLE Previous Post
NEXT ARTICLE Next Post
PREVIOUS ARTICLE Previous Post
 

Delivered by FeedBurner