Saturday, September 29, 2018

आचारसंहिता म्हणजे काय ??


मित्रांनो मित्रांनो काही महिन्याने भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. या निवडणुकीच्या काळामध्ये एक शब्द नक्की कानावरील तो म्हणजे आचारसहिता. आणि आज आपण आचारसंहितेबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.

पहिला आचारसंहिता म्हणजे काय?

निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोग काही नियमांची घोषणा करते हे नियम सर्व लोकसभा विधानसभा व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना लागू पडतात. जर या नियमांचे उल्लंघन सदर उमेदवार अथवा पक्षाकडून झाले तर त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे असतात.

आचारसंहिता लागू कधी होते? 

ज्या दिवशी निवडणूक आयोग प्रत्यक्ष निवडणुकीच्या तारखा जाहीर करते त्या दिवसापासून ते निवडणूक होईपर्यंत म्हणजेच मतदानाच्या दिवसापर्यंत आचारसंहिता लागू होते.


ती कुणावर लागू होते? 

आचारसंहिता आहे उमेदवार पक्ष आणि पक्षातील सर्व कार्यकर्त्यांवर लागू होते.

यातील काही महत्त्वाचे नियम खालीलप्रमाणे 

1)या काळामध्ये कोणताही मंत्री नवीन भूमिपूजन उद्घाटन अथवा नवीन सरकारी धोरण घोषित करू शकत नाही. कारण अशा कृतीमुळे सत्ताधारी पक्षाला जास्त फायदा होतो आणि यामुळे निवडणुकीचे निपक्षपातीपणाचे तत्वाचे उल्लंघन होईल.
 2) सरकारी गाड्या बंगले विमाने यांचा उपयोग सत्ताधारी पक्ष करू शकत नाही.
3)कोणताही पक्ष धार्मिक स्थळाच्या उपयोग निवडणुकीच्या प्रचारासाठी करू शकत नाही.
4)मत मिळवण्यासाठी मतदारांना पैसे वाटणे अथवा इतर प्रकारचे आमिष दाखवून मत मिळवून हे कायदेशीर रित्या गुन्हा आहे.
5)सत्ताधारी पक्षाने सरकारी यंत्रणा व अधिकाऱ्यांचा उपयोग राजकीय हेतूसाठी करू शकत नाही.
6) इतर पक्षाच्या सभेमध्ये कोणतेही पक्ष बाधा आणू शकत नाही.7)एखाद्या व्यक्तीची खाजगी संपत्ती जसे की जागा, घराची भिंत, व इतर प्रचारासाठी उपयोग करायचा असल्यास त्या व्यक्तीची परवानगी घेणे आवश्यक आहे.
8)एखाद्या ठिकाणी सभा घ्यायची असेल तर पोलिसांची पूर्व संमती घ्यावी लागेल.
हे वरील काही महत्त्वाच्या नियमांची आपण माहिती घेतली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराला शिक्षा करण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार आहेत. यातील बऱ्याच नियमांचे उल्लंघन होताना तुम्ही पाहिले असतील. पण असो ती एक वेगळी शोकांतिका आहे..
NEXT ARTICLE Next Post
PREVIOUS ARTICLE Previous Post
NEXT ARTICLE Next Post
PREVIOUS ARTICLE Previous Post
 

Delivered by FeedBurner