Saturday, September 29, 2018

मराठी सिनेमा चालत का नाही...??भारतामध्ये सर्वात पहिला चित्रपट म्हणजे राजा हरिश्चंद्र ते एका मराठी माणसाने म्हणजेच दादासाहेब फाळके यांनी केला. थोडक्यात भारताचा पहिला चित्रपट मराठीतच होता असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यानंतर भारतीय चित्रपटसृष्टी विकास अत्यंत वेगाने सुरू झाला. हिंदी सिनेमानेही आपला दबदबा वाढवला कारण हिंदी भाषा ही भारतीय लोकसंख्येच्या जवळपास 40 टक्के लोकांना समजते.

परंतु मराठी सिनेमांनीही त्या काळी 1960 ते 2000 पर्यंत आपला ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटविला. प्रामुख्याने दादा कोंडके, निळू फुले, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांसारख्या कलाकार आणि दिग्दर्शकांमुळे मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्रामध्ये राज करत होती. परंतु त्यानंतरच्या काळामध्ये विशेष 2000 नंतरच्या काळामध्ये मराठी सिनेमापासून प्रेक्षक का दुरावले गेले? याची आपण कारणे बघुयात

 कमी बजेट 

आजच्या मराठी सिनेमांची स्थिती खालावण्याचे कारण कमी बजेट होय. मराठी सिनेमा कमीत कमी 1.5 कोटी तसेच जास्तीत जास्त पाच कोटी पर्यंतच्या बजेटमध्ये असतात. त्यामुळे एवढ्या कमी बजेटवर एक उत्तम सिनेमा बनवणे आजच्या परिस्थितीत अत्यंत कठीण आहे. त्याला सैराट आणि नटसम्राट यासारखी अपवाद आहेत. परंतु बहुतांश मराठी सिनेमांची तुलना करता दक्षिणात्य (साऊथची) सिनेमाचे बजेट हे साधारणता पन्नास ते शंभर कोटीच्या घरात असते आणि त्यांची कमाई साधारणतः 100 ते 300 कोटीच्या घरात असते

प्रमोशनवर भर न देणे

मराठी सिनेमे कधी येतात आणि रिलीज होतात याची प्रेक्षकांना कल्पनाही नसते. काही सिनेमे टीव्हीवर दिसल्यानंतर प्रेक्षकांना हा सिनेमा आला होता कळते. हे खूप मोठे कारण आहे .

पटकथा 

कमी बजेट असल्याने सिनेमातील पात्र स्थळे जागा ह्या खूप लहान अथवा मर्यादित राहतात. थोडक्यात आजच्या काळात सिनेमे आणि मालिका यातील काहीच अंतर असल्यासारखे जाणवते.

ग्रामीण शहरी तफावत 

बहुतांश मराठी सिनेमे हे शहरांमध्ये शूट केले जातात आणि त्यात सर्व शहरी लाइफस्टाइल विषयी दाखवले जाते. परंतु महाराष्ट्रातील जास्त प्रेक्षक हे ग्रामीण भागातील आहेत. चित्रपट ग्रामीण भागावर असल्यास प्रेक्षक आजही आवडीने बघतात. उदा. सैराट, नटरंग, बबन.

हिंदीचा प्रभाव 

मुंबई म्हणजे बॉलीवूड चे माहेर घर त्यामुळे सहाजिकच महाराष्ट्रीयन लोकांचा कल हिंदी सिनेमा कडे वळाला.
आपली मानसिकता
मराठी माणूस हिंदी सिनेमे आणि साउथचे सिनेमे यांकडे खूप आकर्षित झालेला आहे. मराठी सिनेमे खूप बोर असतात फालतू असतात. हिंदी सिनेमा किती खराब असला तर प्रेक्षक त्याला आवडीने बघतात थोडक्यात हिंदी आणि साउथ त्यांच्या रूपात ठेवला आहे मराठी सिनेमा करू शकले नाहीत.

थिएटर स्क्रीन 

मराठी सिनेमाला थिएटर स्क्रीन मिळत नाही आणि मिळाली तर ती ही खूप कमी भेटतात. हे एक खूप महत्त्वाचे कारण आपल्या सांगता येईल.

नाकारात्मक बाजू आपण पाहिल्या आता सकारात्मक बाजू पाहू.

मूल्यांना जपणारी

जास्तीत जास्त मराठी सिनेमा स्वतःच्या मूल्यावर आधारित असतात. प्रेक्षकाला पत्रामध्ये स्वतः असल्याची जाणीव मराठी सिनेमे करून देतात.

पुरस्कार

अनेक मराठी चित्रपट कमाई जरी माझे असले तर राष्ट्रीय पुरस्कारात मात्र प्रथम असतात .

असे नाही की मराठी चित्रपट चालत नाही असे खूप उदाहरण आहेत जसे की नटरंग, नटसम्राट, सैराट, बॉईज, बॉईज टू पोस्टर बॉईज, पोश्टर गर्ल, लय भारी  आपल्याला देता येईल.
तर मित्रांनो लेख कसा वाटला नक्की खाली कंमेंट करा. आणि या कारणाव्यतिरक्त इतर एखादे कारण तुमच्याकडे असेल अथवा मराठी सिनेमांविषयी मत मांडू शकता.
NEXT ARTICLE Next Post
This Is The Oldest Page
NEXT ARTICLE Next Post
This Is The Oldest Page
 

Delivered by FeedBurner